कृषीमंत्र्यांच्या घराला आंदोलकांचा वेढा

December 14, 2010 6:10 PM0 commentsViews: 1

14 डिसेंबर

ऊसाला पहिला हप्ता दोन हजार रुपये मिळावा यासाठी बारामती तालुक्यात आंदोलन सुरु असून हे आंदोलन चांगलंच तापलं आहे. सोमेश्वर पाठोपाठ आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी कृषी समितीच्या कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री पवार यांच्या बंगल्यासमोर उपोषणास बसणा-या कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळपासूनच पवार यांच्या बंगल्याला जिल्ह्यातून पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला होता. उपोषणकर्ते आले असता आपण इथं न बसता प्रांतकार्यालयासमोर उपोषणाला बसावं, परंतु त्या ठिकाणीही उपोषणाला बसू न दिल्याने कार्यकर्ते संतापून परत पवार यांच्या गोविंदबाग इथल्या बंगल्याकडे निघाले.

त्यानंतर आपल्या वाहनातून उतरत असतानाच पोलीसांनी यांना अटक करुन त्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसवले. याप्रकाराने या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही जामीन घेणार नाही असे आंदोलन कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. अटक केलेल्यांमध्ये रंजन तावडे यांच्यासह माजी आमदार विजय मोरे, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संगीता निंबाळकर, हर्षवर्धन पाटील यांचे मेहुणे जर्नादन झांबरे, शिवसेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांना अटक करण्यात आली.

close