स्पेक्ट्रम प्रकरणी सीबीआयची धडक मोहीम सुरु

December 15, 2010 9:07 AM0 commentsViews: 3

15 डिसेंबर

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी सीबीआयनं आज तामीळनाडू आणि दिल्लीत 34 ठिकाणी छापे टाकले आहेत. लॉबीस्ट नीरा राडिया आणि ट्रायचे माजी सचिव प्रदीप बैजल यांच्या घरी आणि ऑफिसवर छापे टाकण्यात आले आहे. नीरा राडिया हिच्या छत्तरपूर इथल्या सुदेश फार्महाऊस आणि मालछा मार्ग, गोपाल दास भवन इथल्या ऑफिसवर छापे टाकण्यात आले. तर बैजल यांच्या नोएडा इथल्या घरावर छापा टाकण्यात आला आहेत. महेश जैनच्या घरावरही छापे टाकण्यात आले. महेश जैन हा हवाला दलाल असून ए राजा यांच्या डायरीत त्याचं नाव होतं. महत्वाची कागदपत्र गोळा करण्यासाठी हे छापे टाकण्यात आले. ए राजा यांचे चार्टंड अकाउन्ट यांच्या चेन्नईच्या घरावर आणि तामीळ मॅगझीनच्या एका पत्रकाराच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहे.

close