शिवसेनेच्या 5 आमदारांचे निलंबन रद्द होण्याची शक्यता

December 15, 2010 9:25 AM0 commentsViews: 1

15 डिसेंबर

विधानसभेत गोंधळ घालणार्‍या पाचही शिवसेना आमदराचे निलंबन रद्द होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या चर्चेदरम्यान अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला आणि राज्यघटनेचा अवमान केला म्हणून अधिवेशनाच्या दुसर्‍याचं दिवशी 5 शिवसेना आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केलं होत. आशिष जयस्वाल, रविंद्र वायकर, संजय राठोड, अभिजीत अडसूळ, शरद पाटील या आमदारांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

यांची शिक्षा कमी करावी असे प्रयत्न त्यावेळी झाले होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी यावर अंतिम निर्णय घेऊ असं सरकारने म्हटले होते. त्या आश्वासनानुसार या बद्दलचा प्रस्ताव विधानसभेत येण्याची शक्यता असल्याची सुत्रांची माहिती आहे.

close