ऍम्बी व्हॅलीमध्ये महिला कर्मचार्‍यावर बलात्कार

December 15, 2010 8:45 AM0 commentsViews: 1

15 डिसेंबर

ऍम्बी व्हॅलीत झालेल्या बलात्कार प्रकरणाला 72 तास उलटून गेले तरी या प्रकरणातील आरोपींना पोलीस अजूनही पकडू शकले नाहीत. शिवाय या प्रकरणी पोलीस काही बोलायलाही तयार नाही. त्यामुळे पोलीस ह प्रकरण दाबतायत काय अशाही शंका आता घेतल्या जाऊ लागल्या आहे.पुण्यातल्या ऍम्बी व्हॅलीमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीच्या महिला कर्मचार्‍यावर बलात्कार झाल्याची घटना शनिवारी घडली.

या प्रकरणी पौंड पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. पीडित महिला मुळची मुंबईची असून ती पुण्यात एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करते.ऍम्बी व्हॅलीतील एका रिसॉर्टमध्ये या मल्टीनॅशनल कंपनीच्या अधिकार्‍यांची एक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला या महिलेसह अडीचशे अधिकारीही उपस्थित होते. शनिवारी रात्री हे सगळेजण रिसॉर्टमध्ये मुक्कामाला असतानाच बलात्काराची ही घटना घडली. घटनेला तीन दिवस उलटून गेले तरीही पोलीसांचा फक्त तपासच सुरु आहे. त्यामुळे आता यात काही काळबेरं असल्याच्या शंका घेतली जात आहे.

कर्मचारी महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कंपन्यांची आहे – निलम गोर्‍हे

पुण्यातील ऍम्बी व्हॅली बलात्काराचा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. या प्रकरणी शिवसेनेच्या आमदार निलम गोर्‍हे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. औचित्याचा मुद्याद्वारे त्यांनी हे प्रकरण उपस्थित केले. आयटी कंपन्यामध्ये अशी प्रकरणं सातत्याने घडतात. कामावर जाणार्‍या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कंपन्यांचीही आहे. पण ही जबाबदारी घेतली जात नाही. राज्यात महिला सुरक्षित नाही हे या घटनेवरुन दिसून येतं. संबधीत महिलेची आणि संशयित आरोपीची डिएनए चाचणी घेतली जावी अशी मागणी नीलम गोर्‍हे यांनी केली. दरम्यान सरकारकडून या प्रकरणाच्या तपासासंदर्भात निवेदन करण्याचे आदेश उपसभापती वंसत डावखरे यांनी दिले.

close