मिहान प्रकल्प ग्रस्तांच्या पुर्नवसनात दिरंगाई झाल्याची मुख्यमंत्र्यांची कबुली

December 15, 2010 8:54 AM0 commentsViews: 22

15 डिसेंबर

नागपुरातल्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनाचे पॅकेज 2 वर्षांपूर्वी जाहीर झालं होत. पण यावर शासकीय आदेश निघालेला नाही असा आरोप भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला. आज विधानसभेत मिहान प्रकल्पाविषयी चर्चा झाली त्यात बोलतांना देवेद्र फडणवीस यांनी हा आरोप केला.

या प्रकल्पासंबधी केसेसचा निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली. या चर्चेदरम्यान मिहान प्रकल्पग्रस्तांना नोकरी किंवा घराला 5 लाख रुपये प्रती मोबदला देण्याची मागणी कामठीचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नाही. तर 17 डिसेंबरपासून मिहानचे काम बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान मिहान प्रकरणात दिरंगाई झाल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केलं. या संदर्भात पुर्ण माहिती घेऊन उद्या विधानसभेत माहिती देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

close