कलमाडींना समितीवरुन हटवा सीबीआयची मागणी

December 15, 2010 11:08 AM0 commentsViews: 2

15 डिसेंबर

सुरेश कलमाडी आणि ललित भानोत आणखी अडचणी सापडले आहे. सुरेश कलमाडी आणि ललीत भानोत यांना कॉमनवेल्थ आयोजन समितीवरुन हटवा अशी मागणी सीबीआयनं केली. हे दोघे कॉमनवेल्थ घोटाळ्याच्या तपासात अडथळा निर्माण करत असल्याची तक्रार सीबीआयचे संचालक ए. पी. सिंग यांनी लेखी तक्रार केंद्र सरकारकडे केली आहे.

कॅबिनेट सचिव के. एम. चंद्रशेखर यांच्याकडे गेल्या आठवड्यात ही तक्रार करण्यात आली. कॉमनवेल्थ गेम्सच्या घोटाळ्यानंतर काँग्रेसने आयोजन समितीचे चेअरमन खासदार सुरेश कलमाडींना काँग्रेस वकीर्ंग कमिटीच्या सेक्रेटरी पदावरून दूर केलं. तसेच कॉमनवेल्थ गेम्सनंतरच्या कार्यक्रमापासून सुद्धा दूर ठेवल होतं. तरीही कलमाडी आणि भानोत सीबीआयच्या चौकशीत ढवळाढवळ करत असल्याची तक्रार आता सीबीआयने केली.

close