हिरो आणि होंडाचे मार्ग बदलणार

December 15, 2010 2:48 PM0 commentsViews: 4

15 डिसेंबर

25 वर्षांच्या मोठ्या भागीदारीनंतर आता हिरो आणि होंडा या दोन कंपन्या वेगळ्या होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हिरो कॉर्पाेरेशनच्या संचालक मंडळाने ही भागीदारी संपवण्यासाठी मंजुरी दिली. हिरो कॉर्पोरेशन आता होंडाकडून 26 टक्के शेअर्स विकत घेणार आहे. त्याची किंमत 1 ते सव्वा अब्ज डॉलर एवढी असेल. हिरो-होंडाच्या संचालक मंडळाची उद्या दिल्लीत यासंदर्भात बैठक होणार आहे.

close