पाकिस्तानाचे निवृत्त न्यायाधीश जस्टीस नासीर जाहीद यांची भारत भेट

December 15, 2010 2:55 PM0 commentsViews: 2

15 डिसेंबर

पाकिस्तानमधील सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश जस्टीस नासीर जाहीद हे एका कार्यक्रमानिमित्त सध्या मुंबईत आले. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुझरर्फ यांच्या हुकुमशाहीला त्यांनी केलेला विरोध आणि त्यामुळे मुशरर्फ यांनी जस्टीस नासीर यांना पदावरुन हटवल्यामुळे जगभरात हा विषय गाजला होता. पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतातल्या 28 तुरुंगामध्ये जस्टीस नासीर यांचं काम सुरु आहे. मानवी हक्कांचे ते खमके प्रणेते म्हणून जगभरात त्यांची ओळख आहे. सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमधून 442 भारतीय कैद्यांची सुटका करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती. 13 डिसेंबरला पाकिस्तानने सोडलेल्या, आणखी 12 भारतीय कैद्यांनी भारतात मंगळवारी प्रवेश केला.

close