‘व्हिनस सोसायटी’ भूखंड घोटाळाची सीआयडी चौकशी होणार

December 15, 2010 4:31 PM0 commentsViews: 2

15 डिसेंबर

नवी मुंबईतल्या 'व्हिनस सहकारी गृहनिर्माण संस्थेनं' केलेल्या भूखंड घोटाळ्याची सीआयडी चौकशी होणार आहे. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सभागृहात घोषणा केली. सिडकोचे नुकसान करणा-या व्हिनसचे सगळे लायसन्स तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले.आयबीएन लोकमतने हा भूखंड घोटाळा उजेडात आणला होता. मनसेने यासंदर्भातली लक्षवेधी मांडली होती. या घोटाळ्यात रामानंद तिवारी आणि यांच्यासह काही बडे अधिकारी सहभागी असल्याचा आरोपही मनसेने केला.

close