पंतप्रधानांच्या जीवाला धोका !

December 15, 2010 5:02 PM0 commentsViews: 5

15 डिसेंबर

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवाला धोका असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. लिट्टे या अतिरेकी संघटनेकडून पंतप्रधानांच्या जीवाला धोका आहे. पंतप्रधान पुढच्या महिन्यात तामिळनाडूला भेट देणार आहेत. त्यावेळी लिट्टेचे अतिरेकी पंतप्रधानांवर हल्ला करतील असा इशारा इंटेलिजन्स ब्युरोनं दिला. लिट्टेचे अतिरेकी समुद्रमार्गे भारतात पोचल्याची माहिती आहे.

close