सांगलीच्या वैष्णवीचा लिम्बो स्केटिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

November 1, 2008 10:40 AM0 commentsViews: 4

1 नोव्हेंबर, सांगलीआसिफ मुरसलसांगली जिल्ह्यातल्या तासगावमध्ये वैष्णवी विजय रेपाळ या अवघ्या 5 वर्षाच्या मुलीनं लिम्बो स्केटिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. तिने 85 टाटा सुमोच्या खालून केवळ 54 सेकंदात हे अंतर पार करून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. लिम्बो स्केटिंगमध्ये बेळगावच्या अनिकेत चिंडकने वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर असंच रेकॉर्ड बनवण्याची जिद्द वैष्णवीनं बांधली होती. कठोर मेहनतीच्या जोरावर तिने अनिकेतचा 57 सेकंदामध्ये 83 टाटा सुमो पार करण्याचा विक्रम मोडत 54 सेकंदात 85 टाटा सुमो पार केल्या. भविष्यात 100 टाटा सुमो गाड्या लिम्बो स्केटिंगद्वारे पार करण्याचं तिचं ध्येय आहे. हा रेकॉर्ड करण्यासाठी वैष्णवी गेल्या तीन महिन्यांपासून खूप मेहनत घेत होती. रोज सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास तिनं कसून सराव केला आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी वैष्णवीनं विश्वविक्रम करत स्पर्धेच्या युगात मुलगा मुलगी हा भेद नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.