पुण्यात जमिनी घोटाळाचा अशोक चव्हाण यांचावर आरोप

December 15, 2010 5:30 PM0 commentsViews: 3

15 डिसेंबर

पुण्यातल्या 102 एकरांच्या रामोशी वतनच्या जमिनीप्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हात असल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक रविंद्र बर्‍हाटे यांनी केला. पण आता या आरोपाला महानगरपालिकेनंही दुजोरा दिला.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हे प्रकरण फक्त 12 ते 15 एकरांचं असल्याचा दावा केला होता. आणि आता यासंदर्भात पुणे महानगरपालिकेनेही ही जमीन पालिकेच्या मालकीची असल्याचं मान्य केले आहे. तसेच ही बाब अत्यंत गंभीर असून यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि भूमि अभिलेख यांच्याकडे दिले आहेत.

कोणत्याही परिस्थितीत पुणे महानगरपालिकेची जागा अबाधित राहिल याची दक्षता घ्यावी असं लेखी पत्रंही महानगरपालिकेने दिले आहे. याप्रकरणात आता फौजदारी गुन्हा दाखल करुन सीआयडी मार्फत या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आता बर्‍हाटेंनी केली आहे.

close