नवी मुंबईत एफएसआय चोरी ;महापालिकेचं 500 कोटींचे नुकसान

December 15, 2010 6:05 PM0 commentsViews: 15

15 डिसेंबर नवीमुंबईत उभारण्यात आलेल्या शेकडो इमारतींमध्ये बिल्डरनी मोठ्या प्रमाणात एफ एस आय लाटल्याचे उघड झालं आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे 500 ते 600 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. अशा प्रकारे उभ्या राहिलेल्या इमारतीचे सर्वेक्षण सुरु झालं आणि लवकरच यावर कारवाई करणार असल्याचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे.

नवीमुंबईतील क्वीन्स नेकलेस रोड समजला जाणारा पामबीच रोड मार्गावरच्या इमारतींमधील घरं सर्वात महाग आहेत. या मार्गावर जवळपास 300 इमारती आहेत. याच इमारतीं मधील प्रत्येक घरामागे 100 ते 300 स्क्वेअर फूटांच्या वाढीव बांधकामाची चोरी करण्यात आली. पण आता महानगरपालिका प्रशासनाने अशा बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.

नवीमुंबई महापालिकेच्या नियमानुसार 1000 स्के.मी वरील भुखंडावर दीड एफ एस आयने बांधकाम करता येतं तर 1000 स्के.मी. पेक्षा कमी भूखंडावर 1 एफएसआयने बांधकाम करता येतं . पण महानगरपालिकेकडून 700 स्क्वेअर फुटांचे बांधकाम प्रमाणपत्र घेऊन त्यावर 1000 स्क्वेअरफुटांचे बांधकाम केले जाते. म्हणजे एकुण इमारतीत चक्क अर्धा एफएसआय चोरला जातो. पण या सर्व घोटाळ्यामागे महानगरपालिका अधिकारी आण बिल्डर्सचा हात असल्याचा आरोप होत आहे.

close