हेमंत करकरे यांच्याशी झालेल्या संभाषणाचा पुरावा नाही-गृहमंत्री

December 16, 2010 9:21 AM0 commentsViews: 8

16 डिसेंबर

26/11 हल्ल्यात शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरेंचे दहशतवादी हल्ल्याअगोदर आपल्याशी फोनवरुन संभाषण झालं होतं. आपलं बोलणं झाल्याचा पुरावा आपल्याकडे आहे आणि आपण आपल्या विधानावर ठाम आहोत असा काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी गौप्यस्फोट केला होता. आर. आर. पाटील यांनी या प्रकरणाबद्दल खुलासा केला आहे.

हेमंत करकरे यांच्याशी संभाषण झालं याचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण आज गृहमंत्र्यांनी विधानसभेत दिला. याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री आर आर पाटलांनी खुलासा केला. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरेंची हत्या ही पाक दहशतवाद्यांनी केली असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं होते. तर हेमंत करकरेंचे दहशतवादी हल्ल्याअगोदर आपल्याशी फोनवरुन संभाषण झालं होतं असा गौप्यस्फोट दिग्विजय सिंह यांनी केला होता.

close