आमदारांच्या वेतनवाढीचं विधेयक मंजूर

December 16, 2010 9:37 AM0 commentsViews: 3

15 डिसेंबर

खासदारांनंतर आता आमदारांनाही वेतनवाढ मिळाली आहे. आज (गुरुवारी) अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हर्षवर्धन पाटील यांनी आमदारांच्या गदारोळातचे वेतनवाढीचं विधेयक मांडलं. आणि तो मंजूरही करुन घेतल. दरम्यान आज सभागृहाचे कामकाज सुरु होताचं सानंदा प्रकरणावरुन आज विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला या प्रकरणी सरकारने निवेदन करावे अशी मागणी विरोधकांनी केली. सरकार याबाबत बोलत नाही म्हंटल्यावर विरोधकांनी गदारोळ सुरु केला. आणि या गदारोळातचं वेतवाढीचं विधेयक मंजूर करण्यात आलं.

आमदारांचं सध्याचं वेतन

एकूण वेतन – 44 हजार बेसिक – 2 हजारमतदारसंघ भत्ता – 25 हजारफोन बिल भत्ता – 8 हजारस्टेशनरी – पत्रव्यवहार – 7500इतर खर्च – 1500 रुपये

भत्ते आणि सुविधा

सत्र सुरू असताना दररोजचा भत्ता – 500 रुपयेराज्यात 20 वेळा मोफत विमान प्रवासदिल्लीसाठी 4 वेळा मोफत विमान प्रवास 30 हजार कि.मी.पर्यंत मोफत रेल्वे प्रवास पेट्रोल खर्च – 6 रुपये प्रती कि.मीखाजगी सचिवांचा पगार – 8000 रुपयेपेन्शन – 15,000 रुपये

close