टू जी स्पेक्ट्रम प्रकरणी सीबीआयच्या तपासावर सुप्रीम कोर्टाची नजर

December 16, 2010 10:21 AM0 commentsViews: 6

16 डिसेंबर

टू जी स्पेक्ट्रम घोटाळाच्या सीबीआय चौकशीवर सुप्रीम कोर्ट नजर ठेवणार आहे. त्यामुळे यूपीए बरोबरच आता एनडीए सरकारही अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण 2001 ते 2007 पर्यंत देण्यात आलेल्या लायसन्सची चौकशी आता करण्यात येणार आहे. 10 फेब्रुवारी 2011 पर्यंत सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडून प्रगती अहवाल मागवला आहे. त्यामुळे माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांच्याबरोबरच इतरही नेते आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या चौकशीवर सुप्रीम कोर्ट देखरेख ठेवणार असल्यामुळे आता राजकीय हस्तक्षेप होणार नाही.

close