नवी मुंबई विमानतळ मेट्रो आणि मोनो रेलने जोडणार

December 16, 2010 11:01 AM0 commentsViews: 9

16 डिसेंबर

नवी मुंबईत होणार्‍या नव्या विमानतळ आता मेट्रो आणि मोनो रेलने जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी विधानसभेत ही माहिती दिली. विरोधी पक्षाने वाहतूक कोंडी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राज्य सरकारच्यावतीने जाधव यांनी ही माहिती दिली. या कामासाठी ली या कन्सलटंट कंपनीला आराखडा तयार करायला सांगण्यात आलं. पहिला टप्पा नवी मुंबई एअरपोर्ट ते वडाळा तर दुसरा टप्पा नवी मंुबई ते ठाणे असा असेल.

close