पुण्यात 24 ऊस आंदोलकांना अटक

December 16, 2010 12:00 PM0 commentsViews: 1

16 डिसेंबर

राज्यभरात ऊसाचं आंदोलन दिवसेंदिवस वाढतचं चालले आहे. पुण्यातील सोमेश्वर साखर कारखाना परिसरात आंदोलन करणार्‍या शेतकरी कृषी समितीचे सतीश काकडे यांच्यासह 24 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. या आंदोलकांवर लाठीमारही करण्यात आला होता. या आंदोलकांनी जामीन घ्यायला नकार दिला. त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली. या आंदोलकांच्या अटकेच्या निषेधार्थ आज निरा शहर, सोमेश्वर नगर, वाणेवाडी परिसरात व्यापार्‍यांनी बंद पुकारला आहे. अहमदनगर येथे पोलीसांकडून मारहाण

राज्यात उसाच्या दराचा प्रश्न चांगलाच गाजतो. अहमदनगर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी अद्याप ऊसाला भाव जाहीर केलेले नाहीत. जाहीर केलेत ते भाव 1200 ते 1400 रुपये इतके आहेत. मात्र शेतकर्‍यांची मागणी आहे ऊसाला पहिली उचल 2200 रूपये मिळाली पाहिजे या मागणीसाठी सध्या शेतकरी संघटना जिल्ह्यातील साखर कारख्यान्यांवर ठिय्या आंदोलन करत आहे. मात्र शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍याना कारखाना प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून मारहाणीच्या घटना घडत आहे.

close