कोल्हापूरात अतिक्रमण हटवा मोहिम जोरात सुरु

December 16, 2010 12:21 PM0 commentsViews: 13

16 डिसेंबर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवण्याची मोहिम जोरात सुरू आहे. आज सकाळी 6 वाजता पुन्हा या मोहिमेला सुरूवात झाली. मध्यवर्ती बस स्थानकाच्या परिसरात असणार्‍या स्टॉल्स, दुकान गाळे, फेरीवाले यांचा विरोध मोडीत काढत सर्व अतिक्रमणे हटवली. फेरीवाल्यांनी महानगरपालिकेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. आधी पुनर्वसन करा मग अतिक्रमण काढा अशी भूमिका फेरीवाल्यांनी घेतली. पण अधिकार्‍यांनी फेरीवाल्यांचे काही ही न ऐकता ही कारवाई चालूच ठेवली. कोल्हापुरातले स्थानिक आमदार अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने आमदारांचे विरोध टाळण्यासाठी अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेतली.

close