राज्य सहकार बँकेला सहकारी क्षेत्रातूनच विरोध

December 16, 2010 12:45 PM0 commentsViews: 11

16 डिसेंबर

राज्य सहकारी बँकेचा व्यवहार पुन्हा एकदा संशयाच्या भोवर्‍यात अडकला आहे. या बँकेने सहकारी बँकिंगचे तत्व न पाळता पुण्यातले बांधकाम व्यावसायिक बिल्डर अविनाश भोसले यांच्या प्रस्तावित पंचतारांकित हॉटेलसाठी 100 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केलं. राज्य बँकेच्या या धोरणाला सहकारी बँकिंग क्षेत्रातूनच विरोध होत आहे.

नवी मुंबईतल्या पामबीच रोडवरची नियोजित पंचतारांकित हॉटेलची जागा परस्पर दुसर्‍या बिल्डरला विकल्या नंतर पुण्याचे बिल्डर अविनाश भोसले मुंबईतल्या फोनिक्स मिल कंपाऊंडवर अलिशान पंचतारांकित उभारत आहेत. चारशे दहा रुम आणि तेवीस सर्व्हिस अपार्टमेंटच्या पलॅझियो हॉटेलच्या बांधकामाला आठशे पंचेचाळीस कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी पाचशे तीस कोटी रुपयांचे कर्ज उभारले जातं.

यामध्ये राज्य सहकारी बँकेनेही शंभर कोटी रुपयांचे कर्ज देऊ केले. पण अविनाश भोसले यांच्या समूहामध्ये संयुक्त कर्ज पुरवठादार म्हणून कोटक महिंद्रा ही खाजगी बँक असतानाही राज्य सहकारी बँकेने कर्ज कसं काय मंजूर केलं असा सवाल सहकारी बँकिंग क्षेत्रातून उपस्थित होत आहे. राज्य सहकारी बँकेचा यावर्षी शताब्दी महोत्सव सुरू आहे. आणि या वर्षातचं बँकेला आपल्या सुमार कामगिरीमुळे ड वर्ग मिळाला. अशा परिस्थितही राजकारण्यांचे हितसंबध जपताना राज्य बँकेकडून नियम बाह्यरित्या कर्जाचं वाटप होतं.

close