फू बाई फू – 2 चे अंशुमन विचारे आणि अतुल तोडणकर महाविजेते

December 16, 2010 12:53 PM0 commentsViews: 8

16 डिसेंबर

झी मराठीवरच्या कॉमेडी रियालिटी 'शो फू बाई फू सिझन 2' चा बुधवारी रात्री महाअंतिम सोहळा पार पडला. नेरूळ येथील डी वाय पाटील ऑडिटोरियम मध्ये पार पडलेल्या या महाअंतिम फेरीत अंशुमन विचारे आणि अतुल तोडणकर ही जोडी महाविजेती ठरली. तर सचिन कारंडे आणि सुनील तावडे हे उपविजेते ठरले. तर दिगंबर नाईक आणि आनंद इंगळे जोडी तिसर्‍या क्रमांकावर राहिली. या महाअंतिम सोहळ्यासाठी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती. 'फू बाई फू'च्या या सिझन 2 च्या फायनलला एकूण पाच जोड्या अंतिम फेरीत पोहचल्या होत्या. फू बाई फूच्या पहिल्या सिझनमध्ये वैभव मांगले आणि विशाखा सुभेदार ही जोडी महाविजेती ठरली होती. फू बाई फू या रियालिटी शोचे यावर्षीचे जज म्हणून निर्मिती सावंत आणि स्वप्नील जोशी यांनीच काम पाहिलं होतं.

close