कॉलेज फेस्टिवलच्या निमित्तानं ग्लोबल वार्मिंगची जनजागृती

December 16, 2010 7:57 AM0 commentsViews: 32

16 डिसेंबर

कॉलेज फेस्टीवल म्हटला म्हणजे मस्ती आणि धमाल. या मस्तीला पर्यावरण जाणिवेची जोड देत एस.आय.डब्लु.एस. वडाळा या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ग्लोबल वार्मिंग ही थिम घेऊन आपला कॉलेज फेस्टिवल साजरा केला. या फेस्टिवलमध्ये 26 पेक्षा अधिक महाविद्यालयांनी भाग घेतला होता. या फेस्टिवलमध्ये ग्लोबल वार्मिंग या विषयावर आधारीत रांगोळ्या, पोस्टर मेकिंग यासारख्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेचाही इथे वापर केला गेला. सध्या जग ग्लोवल वार्मिंगशी झुंजत आहे. तरुण पिढीने आपल्या परीन लोकंाना ग्लोबल वार्मिंग बद्दल माहिती देऊन यानिमित्तानं जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

close