भारताच्या मिशन दक्षिण आफ्रिकेला आजपासून सुरुवात

December 16, 2010 1:02 PM0 commentsViews: 1

16 डिसेंबर

आजपासून सेंच्युरीयन मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरूवात होत आहे. झहीर खान या मॅचमध्ये खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह मात्र कायम आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी यावर निर्णय घेण्यात येईल. पण जर झहीर खान मॅचमध्ये खेळला नाही तर जयदेव उनाडकट टेस्टमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. शिवाय उमेश यादवचीही वर्णी टीममध्ये लागण्याची शक्यता आहे. सरावादरम्यान भारताचा दरा फास्ट बॉलर एस. श्रीसंतलाही दुखापत झाली होती. पण तो मॅचसाठी फिट असल्याचे कळते. टेस्ट रँकिंगमध्ये भारत सध्या नंबर वन आहे.आणि या सीरिजमध्येही भारतीय टीम चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा सगळ्यांना वाटते.

close