महापालिकेत नोकरीचं आमिष देऊन लाखोंचा गंडा घालणार्‍या तरुणीला अटक

December 16, 2010 2:20 PM0 commentsViews: 5

अलका धुपकर, मुंबई

16 डिसेंबर

महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळवून देते असं आमिष दाखवून मुंबईमध्ये अनेकांना लाखोंचा गंडा घातलेल्या एका तरुणीला ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली. हा धक्कादायक प्रकार म्हणजे महानगरपालिक च्या काही अधिकार्‍यांच्या मदतीनेचे तिने हे रॅकेट चालवल्याची माहिती पोलिसांनी दिली.आता महानगरपालिक ा मधल्या या रॅकेटचा पोलीस अधिक शोध घेत आहे.

माहिममध्ये राहणार्‍या 24 वर्षांच्या दिप्ती मुळीक या तरुणीने आपल्या चलाखीने अनेकांना अशा प्रकारे गंडा घातला. बीएमसी आयुक्त, महापौर, अधिकारी यांचे शिक्के, सह्या, लेटरहेड आणि खोटी अपॉईटमेंट लेटर दिप्तीकडून जप्त करण्यात आले.

बीएमसीचे अधिकारी संभाजी पाटील आणि दिप्ती मुळीक यांना 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आले. या रॅकेटकडून फसवणूक झालेल्या सर्वांनी ना म जोशी मार्ग पोलीस स्टेशनकडे तातडीने तक्रारी द्याव्यात असं आवाहन आता पोलिसांनी केले.

close