नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत लांबणीवर

December 16, 2010 3:04 PM0 commentsViews: 2

16 डिसेंबर

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने आणखी एक धक्का दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरकारकडून मिळणारी मदत आता आणखी लांबणीवर जाणार हे स्पष्ट झालं आहे. अवकाळी पाऊस झालेल्या भागातून मागवण्यात आलेल्या पंचनाम्यांच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे या पंचनाम्यांच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत.

अवकाळी पावसाबाबत मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात ही माहिती दिली. अवकाळी पाऊस झालेल्या भागातून पंचनामे मागवण्यात आले होते. पंचनाम्याच्या आकड्यात तफावत होती. पंचनाम्याचे आकडे प्रचंड वाढले होते तर काही ठिकाणी अजिबात नुकसान नाही असे आकडे आले आहे. पंचनाम्यातल्या या तफावतीमुळेच चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती आज मुख्यमंत्र्यांनी दिली.

close