अबु आझमींना क्लिन चीट

December 16, 2010 3:38 PM0 commentsViews: 1

16 डिसेंबर

विधानसभेतल्या धक्काबुक्की प्रकरणात अबु आझमी यांना क्लिन चीट देण्यात आली आहे. मनसे आमदारांना चप्पल दाखवल्याचे हे प्रकरण होतं. मनसे आमदारांनी आझमींनी मराठीतून शपथ न घेतल्याने मारहाणीचे प्रकरण घडले होते. 9 नोव्हेंबर 2009 ला विधानसभा अध्यक्षांनी विधानसभा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली याची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल नुकताच आला आहे. अहवालानूसार साक्षीदारांची साक्ष आणि टीव्ही फुटेजवरुन चप्पल मारण्याचा हेतु स्पष्ट होत नाही. असा समितीचा निष्कर्ष आहे. संशयाचा फायदा देत अबू आझमी यांना क्लिन चीट देण्यात आली. पण अबु आझमी यांचे हावभावही चिथावणीखोर होते असही समितीच मत आहे.

close