ठाणे साहित्य संमेलनाला बसला महापालिकेच्या कारभाराचा फटका

December 16, 2010 3:55 PM0 commentsViews: 2

16 डिसेंबर

ठाणे साहित्य संमेलन आता जवळ आलं पण वाद काही या संमेलनाची पाठ सोडताना दिसत नाहीत. आता महानगरपालिकेच्या कारभाराचा फटका संमेलनाच्या कामाला बसला आहे. संमेलनासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये उभारण्यात येणार्‍या मंडपाचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बंद पाडलं. या कामासाठी मागवण्यात आलेल्या निविदा उघडण्यापूर्वीच मंडपाचे काम सुरू केल्याचा आरोप करत काँग्रेसने-राष्ट्रवादीने हे काम बंद पाडलं. संमेलनाच्या आयोजकांनी मात्र ही जबाबदारी महानगरपालिकेची असल्याने त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर महानगरपालिकेने मात्र काहीही माहिती दिलेली नाही.

close