आमदारांची आमदनी भरघोस

December 16, 2010 4:32 PM0 commentsViews: 4

16 डिसेंबर

खासदारांनंतर आता आमदारांनाही 75 टक्के एवढी भरघोस वेतनवाढ मिळाली. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हर्षवर्धन पाटील यांनी वेतनवाढीचे विधेयक मांडले आणि ते मंजूरही करुन घेतले. हे विधेयक मंजूर झाले त्यावेळी सभागृहामध्ये सानंदा प्रकरणावरुन जोरदार गोंधळ सुरु होता. पण आमदाराच्या पगारवाढीला मात्र मंजूरी मिळाली आणि हे विधेयक पारित झालं.

मंत्र्यांचा सध्याचा पगार आणि वेतनवाढीनंतरचा पगार

दरमहा मूळवेतन आहे 5000 रुपये वेतनवाढीनंतर होणार 10000 रुपये, घरभाडं 2500 रुपये आणि वेतनवाढीनंतरचा पगार 10000 रुपयेबैठक भत्ता आधी 200 रुपये वेतनवाढीनंतर 500 रुपयेदूरध्वनीसाठी 8000 रुपये आणि वेतनवाढीनंतर 12000 रुपयेरेल्वे किंवा बोट प्रवासासाठी 30000 कि.मी मोफत वेतनवाढीनंतर 50000 किमीपर्यंत मोफतराज्यमंत्र्यांना दरमहा मूळवेतन 4600 रुपये वेतनवाढीनंतर ते असेल 9200रुपयेमंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या इतर भत्त्यांत फरक करण्यात आलेला नाही

आमदारांच्या पगार

दरमहा मूळवेतन आहे 2000 आणि वेतनवाढीनंतर 8000रुपयेएकत्रित भत्ता 1500 रुपये आणि वेतनवाढीनंतर 3000रुपयेबैठक भत्ता आधी 500 रुपये आणि वेतनवाढीनंतर 1000रुपयेमाईलेज भत्ता आधी 25,000 आणि वेतनवाढीनंतर 46,000रुपयेस्टेशनरीसाठी आधी 7,500 आणि वेतनवाढीनंतर 10,000रुपये

विरोधी पक्षनेत्यांच्या पगार

आधी दरमहा मूळवेतन होतं 5000रुपये वेतनवाढीनंतर 10000रुपयेआधी घरभाडं होतं 2500 रुपये वेतनवाढीनंतर 10000रुपयेआधी बैठक भत्ता होता 200 रुपये वेतनवाढीनंतर 500रुपयेदूरध्वनीसाठी आतापर्यंत होते 8000 रुपये वेतनवाढीनंतर 12000रुपयेआतापर्यंत 30,000 कि.मीपर्यंतचा रेल्वे/बोट प्रवासासाठी मोफत होतेवेतनवाढीनंतर 50,000 कि.मीपर्यंतचा प्रवास मोफत असेल

सध्या वाढीनंतर

दरमहा मूळवेतन 2000 8000एकत्रित भत्ता 1500 3000बैठक भत्ता 500 1000माईलेज भत्ता 25,000 46,000स्टेशनरी 7,500 10,000

close