आंदोलक आणि कारखानदारांनी एकत्र तोडगा काढावा- कृषीमंत्री

December 17, 2010 9:36 AM0 commentsViews: 2

17 डिसेंबर

ऊसाचा दर ठरवतांना आंदोलक आणि कारखानदारांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा असं आवाहन कृषीमंत्री शरद पवारांनी केले आहे.ते आज मांजरीमध्ये बोलत होते. यावेळी पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ऊस दरांच्या वादात लक्ष घालावे अशी विनंती केली. महत्वाचे म्हणजे 5 लाख टन साखर निर्यात करण्याची परवागी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यानंतर प्रत्येक साखर कारखान्याला साखर निर्यातीचा कोटा ठरवून देणार असल्याची घोषणाही पवारांनी केली. तसेच यावेळी मोहिते यांची साखर संघाचे अध्यक्ष आणि दिलीप देशमुख दांडेगावकर यांची उपाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली.

दरम्यान शरद पवारांनी जैतापूर प्रकल्पाबद्दल टीका केली. महाराष्ट्रात पत्रकार, स्वयंसेवी संस्था आणि विरोधी पक्षातील नेत्यांना कुठलेही नवे प्रकल्प नको आहेत.अशी टीका शरद पवारांनी केली. या उलट गुजरातमध्ये पत्रकार, स्वयंसेवी संस्था आणि विरोधी पक्ष एकत्र येउन प्रकल्प पूर्ण करतात अशा शब्दात पवारांनी गुजरातच्या विकासाचे गौडवेही गायले.

close