राज्यभरात मोहरमनिमित्त मातमच्या मिरवणुका

December 17, 2010 8:44 AM0 commentsViews: 49

17 डिसेंबर

राज्यभरात मोहरम साजरा केला जात आहेत. हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असणार्‍या सांगली जिल्हातील कडेगाव इथल्या ताबुतांच्या भेटी आणि मिरवणुकीची तयारी पुर्ण झाली. मोहरम हा मुस्लीम धर्मीयांचा एक पवित्र सण आहे. याला इस्लाम धर्मात एक आगळे वेगळे स्थान आहे. हजरत पैगंबरांचे नातू हजरत इमाम-हुसेन यांनी आपल्या प्राणाची आहूती देऊन इस्लाम जिवंत ठेवला. ज्या दिवशी त्यांचे निधन झाले तो दिवस मोहरम म्हणून पाळण्यात येतो. मुस्लीम धर्मीयांपैकी काही लोक हा दिवस बलिदानाचा दिवस म्हणून शोक करतात. तर काही लोक भेटी घडवून आज आंनद साजरा करतात. हीच परंपरा गेल्या 200 वर्षापासून सांगली जिल्हातील कडेगाव इथं सुरु आहे. या गावात 200- 250 फुट उंचीचे बांबू पासून ताबूत बनवले जातात. अष्टकोनी आकाराचे आणि पाहिल्यांदा कळस आणि मग पाया या पध्तीने हे उभारले जातात. ताबूत बाधतांना चिकणमाती मध्ये सुत गुंडाळून ताबुतांचे मजले एकमेकांवर बसवले जातात आणि असं करतांना यामध्ये कुठेही गाठ दिली जात नाही

चंद्रपुर जिल्हा कारागृहातील दरगाह

चंद्रपुर जिल्हा कारागृह दरवर्षी मोहरम निमित्ताने दोन दिवस खुलं केलं जातं. या कारागृहात मोहम्मद हजरत गैबीशहावलीचा दरगाह आहे. एरवी हा बंद असतो. पण मोहरम च्या दिवशी भाविक या दरगाहवर चादर चढवतात आणि इथल्या विहीरीचे पाणी मोठ्या श्रध्देनं पितात. या विहीरीचं पाणी प्यायलाने सगळे रोग बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

close