ऊसाला दोन हजार भाव द्या अन्यथा महिला मोर्चाचा इशारा

December 17, 2010 10:51 AM0 commentsViews: 2

17 डिसेंबर

ऊसाचा दर ठरवतांना आंदोलक आणि कारखानदारांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा असं आवाहन कृषीमंत्री शरद पवारांनी केले आहे. तर दूसरीकडे ऊसाला पहिला हप्ता 2 हजार रूपये द्या नाही तर महिलांचा मोर्चा काढू असा इशारा पुणे जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी दिला. हा मोर्चा पालकमंत्री आणि प्रशासनाविरोधात काढून त्यांना बांगड्यांचा आहेर देणार असल्याचा इशाराही तावरे यांनी दिला. आज राज्य साखर संघाची बैठक आज पुण्यात होते. माळेगाव कारखान्यावर आंदोलन सुरूच असून येत्या दोन दिवसात निर्णय न झाल्यास या आंदोलनात महिलाही सहभागी होतील असा इशारा देण्यात आला. त्यामुळे हे आंदोलन अधिक पेटणार असच दिसत आहे.

close