सायना नेहवालने परत मिळवले दुसरे स्थान

December 17, 2010 11:33 AM0 commentsViews: 4

17 डिसेंबर

भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने जागतिक बॅडमिंटन क्रमवारितलं आपलं नंबर दोनचं स्थान परत मिळवलं आहे. गुरूवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये सायन नंबर दोनवर असल्याचे सांगितले. गेल्या आठवड्यात सायनाची रँकिंगमध्ये घसरण झाली होती. पण नुकत्याच झालेल्या हाँग काँग सुपर सीरिजमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सायनाने नंबर दोनचे पद पून्हा मिळवलं आहे. पण येत्या 4 आठवड्यात सायना एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणार नाही. त्यामुळे तिच्या रॅकिंगमध्ये पून्हा घसरण होण्याची शक्यता आहे. चीनची झींग वँग आपलं पहिलं स्थान टिकवून आहे.

close