दुबईच्या रंगात रंगले मराठी कलावंत

December 17, 2010 11:50 AM0 commentsViews: 3

17 डिसेंबर

आयफ्फा अवार्डच्या धरतीवर मराठी चित्रपट सृष्टीने मिफ्ता हा पहिला आंतरराष्ट्रीय अवार्ड सोहळा दुबईत आयोजित करण्यात आला आहे. मिफ्ता या आंतरराष्ट्रीय अवॉर्ड सोहळ्या निमित्ताने सध्या मराठी कलाकार दुबईत दाखल झाले. तीन दिवस चालणार्‍या या सोहळ्याचा पहिला दिवस हा फक्त आणि फक्त कलाकारांच्या मनोरंजनासाठी होता. दुबई टूर आणि दुबई सफारी हे पहिल्या दिवसाचं आकर्षण होतं. आणि या मनोरंनादरम्यान काही कलाकारांनी खास परफॉर्मन्सही सादर केले.

close