किंग सर्कल उड्डाणपुल खुला

December 17, 2010 1:09 PM0 commentsViews: 3

17 डिसेंबर

पूर्व उपनगरातून मुंबईकडे येणार्‍या लोकांना दररोज ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी एम.एम.आर.डी.ए नं ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चार ब्रिज बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यापैकी दोन ब्रिजचे काम यापूर्वीच पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली आहे. आज शुक्रवारी किंग सर्कल ते तुळपुळे चौक या उड्डाणपुलाचंही उद्घाटन करण्यात आलं आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 72 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटणार तर आहेच त्यासोबत प्रवाश्यांचा वीस मिनीटांचा वेळ ही वाचणार आहे.

close