धर्मदेव राय मृत्यू प्रकरणातील आरोपींना सोडण्यासाठी कर्जत स्टेशनवर आंदोलन

November 1, 2008 11:15 AM0 commentsViews: 2

1 नोव्हेंबर, कर्जतउत्तर भारतीय तरूण धर्मदेव राय याच्या लोकलमधील मृत्यू प्रकरणी अटक केलेल्या तरुणांना सोडण्याची मागणी होत आहे. यासाठी कर्जत रेल्वे फ्लॅटफॉर्मवर खोपोली आणि कर्जत गावातल्या गावकर्‍यांनी धरणे आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात महिलांही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या आहेत. तरुणांना सोडावं या मागणीसाठी माजी आमदार सुरेश लाड यांनीही तिथं उपोषणही सुरू केलं आहे. खोपोली स्टेशनवर झालेल्या मारहाणीत धर्मदेव राय याचा मृत्यू झाला होता. नंतर या प्रकरणाला मराठी-अमराठी वादाचे स्वरुप देण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात सहा तरुणांना अटक करण्यात आली होती. मात्र या हे तरुण निर्दोष असल्याचा दावा करत त्यांच्या पालकांनी आणि खोपोलीतल्या नागरिकांनी आंदोलन छेडलं आहे.

close