कोकणातल्या 49 मायनिंग प्रकल्पांना पर्यावरण खात्याची स्थगिती

December 17, 2010 2:17 PM0 commentsViews: 3

17 डिसेंबर

कोकणातल्या खाण प्रकल्पावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकल्पांकडे पर्यावरण खात्याने लक्षं घातलं आहे. जिल्ह्यातल्या 49 मायनिंग प्रकल्पांना पर्यावरण खात्याने सध्या स्थगिती दिली. त्याबाबतच्या सूचना महाराष्ट्र सरकारला देण्यात आल्या आहे. समृध्द पश्चिम घाटाचा भाग असलेल्या कोकणात या मायनिंग प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका असल्याचे पर्यावरण तज्ञांचे मत आहे. या प्रकल्पांचा भार सहन करण्याची क्षमत कोकणात आहे का याचा सर्वांगिण अभ्यास करण्याची सूचनाही केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी महाराष्ट्र सरकारला केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा आहे.

close