दक्षिण आफ्रिकेची 150 धावांची आघाडी

December 17, 2010 5:57 PM0 commentsViews: 7

17 डिसेंबर

सेंच्युरिअन टेस्टमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेनं पहिल्याच इनिंगमध्ये भक्कम आघाडी घेतली. आफ्रिकेने दोन विकेट गमावत 350 रन्सचा टप्पा पार केला. आणि पहिल्या इनिंगमध्ये 200 हून अधिक रन्सची आघाडी घेतली. जॅक कॅलिस आणि हाशिम आमला या दोघांनीही आपापली सेंच्युरी पूर्ण केली. या जोडीने तिसर्‍या विकेटसाठी तब्बल 187 रन्सची नॉटआऊट पार्टनरशिप केली. त्याआधी कॅप्टन ग्रॅहम स्मिथ आणि पीटरसननंही हाफसेंच्युरी केली. सेंच्युरियनच्या बाऊन्सी पिचवर भारताचे फास्ट बॉलर्स सपशेल अपयशी ठरले. भारतातर्फे केवळ हरभजन सिंगला 2 विकेट घेण्यात यश आलं.

त्याआधी भारताची पहिली इनिंग अवघ्या 136 रन्समध्ये गडगडली. महेंद्र सिंग धोणी आणि जयदेव उनाडकत या कालच्या नाबाद जोडीला आज एकही रन्स करता आला नाही. धोणी 33 रन्सवर आऊट झाला.

close