हेडलीच्या चौकशीचा देखावा भारताने निर्माण केला !

December 18, 2010 9:28 AM0 commentsViews: 2

18 डिसेंबर

विकिलिक्सच्या खुलाशामुळे राहुल गांधीनंतर आता गृहमंत्री पी.चिदंबरम अडचणीत येण्याची शक्यता आहे. डेव्हिड कोलमन हेडलीची चौकशी केल्याचा फक्त देखावाचे भारताने निर्माण केल्याचे आता स्पष्ट होत आहे. विकिलिक्सने केलेल्या खुलाशानुसार 26/11 च्या हल्ल्यातला आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीची चौकशी करु द्या अशी विनंती खुद्द केद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी एफबीआयचे संचालक रॉबर्ट मुलर यांना केली होती. पण धक्कादायक बाब म्हणजे चिदंबरम मुलर यांना म्हणतात की, "आम्हाला असं म्हणता आलं पाहिजे की आम्ही हेडलीची चौकशी केली. हेडली बोलला नाहीतरी चालेलं" विकिलिक्सच्या या नव्या खुलाशामुळे केंद्र सरकारच्या अडचणी वाढणार आहेत. पुढे झालेल्या संभाषणात चिंदंबरम म्हणतात की "हेडलीचा एकट्याचा यात सहभाग आहे, असं मला वाटतं नाही. तर त्यावर मुलर म्हणतात की, पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांबाबत महत्त्वाची माहिती आम्हाला हेडलीकडून मिळते.

close