कोर्टाच्या आदेशाला इनरकॉननं दाखवली केराची टोपली

December 18, 2010 9:37 AM0 commentsViews: 13

18 डिसेंबर

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारंण्यात सुरु असलेल्या इनरकॉन कंपनीच्या पवनउर्जा प्रकल्पाच्या कामाला मुंबई हाय कोर्टाने गुरुवारी स्थगिती दिली. पण कंपनीने हाय कोर्टाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली. हाय कोर्टाच्या आदेशाला 24 तास उलटून गेले असले तरी प्रकल्पाची काम मात्र वेगाने सुरुच आहेत. कुडे आणि खरपोडी परिसरात विविध यंत्रांव्दारे रस्त्याची कामं आणि वृक्ष तोड सुरुच असल्याचं निदर्शनाला आलं आहे. त्यामुळे आता 23 तारखेला होणार्‍या सुनावणीत आदेश न जुमानणार्‍या इनरकॉन कंपनीला कोर्टाच्या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागल आहे.

close