वर्ल्डकपसाठी टीम मधून द्रविड-इरफानला वगळले

December 18, 2010 10:49 AM0 commentsViews: 1

18 डिसेंबर

फेब्रुवारी महिण्यात वर्ल्डकप 2011 स्पर्धेसाठी आज भारताच्या संभाव्य 30 खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. मुंबईत सिलेक्शन कमिटीची महत्वपुर्ण बैठक पार पडली. 19 फेब्रुवारीपासून भारतीय उपखंडात वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे. कॅप्टन धोणीसह दिनेश कार्तीक, पार्थिव पटेल आणि वृद्धीमान सहा अशा चार विकेट किपरचा समावेश करण्यात आला. तर मुंबईचा अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या दोघांचीही निवड करण्यात आली. फास्ट बॉलर इरफान पठाणला मात्र संभाव्य टीममधून वगळण्यात आलं.

अशी असणार टीम कर्णधार एम एस धोणी, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर,गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, हरभजन सिंग, झहीर खान,आशिष नेहरा, एस श्रीसंत, मुनाफ पटेल, ईशांत शर्मा, विनय कुमार, मुरली विजय, रोहित शर्मा, रविंद्र जाडेजा, अजिंक्य रहाणे,

सौरभ तिवारी, युसुफ पठाण, पार्थिव पटेल, आर अश्विन, वृध्दीमान सहा, दिनेश कार्तिक, शिखर धवन, अमित मिश्रा, पियुष चावला, चेतेश्वर पूजारा, प्रग्यान ओझा, आणि प्रवीण कुमार या तीस खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

close