बिबट्याची कातडी विक्रे त्याला अटक

December 18, 2010 11:17 AM0 commentsViews: 17

18 डिसेंबर

बिबट्याची कातडी विक्रीसाठी आणणार्‍या एका व्यक्तीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडुन बिबट्याची कातडी आणि 30 लाख रुपये किंमतीची नखं हस्तगत करण्यात आली. भुदरगड तालुक्यातील तिरवडे इथला वसंत बाबुराव देसाई हा व्यक्ती कोल्हापूरातील बाजार परिसरात बिबट्याची कातडी विक्रीसाठी आणणार असल्याची बातमी शाहुपुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सदर बाजारमध्ये सापळा रचून पोलिसांनी वसंत देसाईला अटक केली. बिबट्याची कातडी जप्त करण्याची महिन्याभरातील ही दुसरी कारवाई आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बिबट्याच्या कातड्याची किंमत बारा लाख असून नख्याची किंमत तिस हजार रुपये इतकी आहे.पोलिसांनी वसंत देसाईवर भारतीय वन्य जिव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. देसाई यांच्याकडुन एक बंदुकही जप्त करण्यात आली. या बंदुकीच्या सहाय्याने शिकार करण्यात आली आहे का याचा तपास कोल्हापूर पोलीस करत आहे.

close