सारंगखेडच्या एकमुखी दत्त यात्रेला सोमवारपासून सुरुवात

December 18, 2010 11:49 AM0 commentsViews: 21

18 डिसेंबर

नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा इथल्या एकमुखी दत्त यात्रेला सोमवारपासून सुरुवात होत आहे. ही यात्रा घोडा बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी देशभरातून 900 पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहे. राजस्थान, हरीयाणा, उत्तर प्रदेश, पंजाब इथले घोडे विक्रीसाठी आले आहेत. तब्बल 15 दिवस चालणार्‍या या यात्रेतल्या घोडेबाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. पण यात्रेकरूंना प्रशासनाकडून कोणत्याही सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत. तसेच सारंगखेडा धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषीत करण्याची मागणीही होत आहे.

close