जैतापूरमध्ये अपघातानंतर तोडफोड ; पोलिसांना मारहाण

December 18, 2010 12:04 PM0 commentsViews: 8

18 डिसेंबर

जैतापूर मध्ये पोलीस सुमो आणि मोटरसायकल अपघातानंतर मोठा तणाव निर्माण झाला. या अपघातात मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाल्यामुळे जमाव संतप्त झाला. संतप्त जमावाने आत्तापर्यंत पोलिसांची एक व्हॅन पेटवून देऊन दुस-या व्हॅनची ही तोडफोड केली. तसेच आणखी पाच गाड्याही फोडण्यात आल्या आहे. दगडफेक करणा-या जमावाला शांत करण्यास गेलेल्या पोलिसांनाही जबर मारहाण झाली असून यात चार पोलीस गंभीर जखमी झाले. नाटे गावातल्या पोलीस स्टेशनमध्येही सुमारे दीड हजाराचा जमाव असून संतप्त महिला अणुउर्जा प्रकल्पाचा निषेध करत आहेत. जैतापूरकडे मोठा पोलीस बंदोबस्त रवाना करण्यात आला असून या जमावाला शांत राहण्याचे आवाहन शिवसेनेकेडून करण्यात येत आहे.

close