आंदोलनाची रणनिती ठरवण्यासाठी मुंबईत भाजपची बैठक

December 19, 2010 10:02 AM0 commentsViews: 2

19 डिसेंबर

महाराष्ट्र राज्य भाजप कार्यकारणीची बैठक मुंबईत दादरमध्ये होत आहेत. भ्रष्टाचारावर बोलण्याचा काँग्रेसला काही अधिकार नाही. काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचाराची जननी आहे. स्वत:ची पाठ थोपटण्याचे काम आजच्या अधिवेशनात सुरु आहे अशी टीका भाजपचे नेते व्यंकय्या नायडू यांनी केली. या बैठकीसाठी गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पांडुरंग फुंडकर यांच्यासह पक्षाचे इतर नेते हजर राहणार आहेत. भ्रष्टाचार आणि इतर मुद्यांवर जानेवारी महिन्यात भाजप आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभरात आंदोलन सुरु करणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सुत्रांच्या माहितीनुसार कल्याण-डोंबीवली महानगरपालिका आणि जळगांव स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये युती असतानाही शिवसेनेने मदत न केल्याची चर्चा या बैठकीत होणार आहे. तसेच येत्या काळात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपतर्फे मोठं जनजागृती अभियान छेडण्याबाबतही चर्चा होणार आहे.

close