काँग्रेसच्या महाअधिवेशन बिहारच्या पराभवावरुन गोंधळ

December 19, 2010 10:59 AM0 commentsViews: 2

19 डिसेंबर

दिल्लीत काँग्रेसच्या 83व्या महाअधिवेशनाला आज सुरुवात झाली. काही वेळापूर्वी दिग्विजय सिंह यांनी संघावर हल्ला चढवला. आणि आता बिहारच्या कार्यकर्त्यांनी बिहारमध्ये झालेल्या पराभवावरुन महाअधिवेशनातच जोरदार गोंधळ घातला. बिहारमधील काँग्रेसचे प्रभारी मुकुल वासनिक हे पराभवाला जबाबदार असल्याने त्यांना हटवण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुकुल वासनिक हे या निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाचे प्रभारी होते.

close