रायगडमध्ये 54व्या महाराष्ट्र केसरीला सुरुवात

December 19, 2010 3:19 PM0 commentsViews: 4

19 डिसेंबरकुस्तीत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या 54 व्या महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला आजपासून रायगड जिल्हायतल्या रोहा इथं सुरुवात झाली. राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेसाठी राज्यातील सातशेहून अधिक मल्ल रोहानगरीत दाखल झाले आहेत. पाच दिवस चालणार्‍या या स्पर्धेत एकुण 1100 कुस्त्यांचे फड रंगणार आहेत. मॅटवरील आणि मातीतील स्पर्धा अशा दोन प्रकारात या कुस्त्या खेळवल्या जाणार आहेत. जे एम राठी विद्यालयाच्या मैदानात भव्य आखाड्याची उभारणी करण्यात आली असून 25 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे तब्बल 30 वर्षानंतर रायगडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते.त्यामुळे इथल्या कुस्तीप्रेमींमध्येही प्रचंड उत्कुसता आहे.

close