एकतर्फी प्रेमातून विवाहितेवरऍसिड फेकले

December 19, 2010 5:27 PM0 commentsViews: 4

19 डिसेंबर

मुलुंडमध्ये विवाहितेवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून ऍसिड फेकल्याची घटना घडली आहे. या महिलेला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आरोपीला मुलुंड पोलिसांनी अटक केली. मुलुंड इथल्या तांबे नगरमधील शांती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये ही बावीस वर्षीय राणी शेट्ये राहत होती. त्याच इंडस्ट्रीमध्ये काम करणार्‍या दिपक गायकवाड नावाचा 24 वर्षीय तरुण होता. दिपकने राणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र राणीने त्याला नकार दिला. हा नकार दिपक सहन करु शकला नाही. रात्री आठ वाजता राणी रिक्षातून घरी जात असताना तिच्या अंगावर त्याने ऍसीड फेकले. दीपकला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

close