मुंबई विमानतळावर लवकरच अपघाताना आळा

December 19, 2010 5:29 PM0 commentsViews: 2

19 डिसेंबर

मुंबई विमानतळावर होणारे एअर ट्राफिक आणि त्यामुळे होणारे अपघात याला आता पूर्णविराम मिळणार आहे. मुंबई विमातळावर यासाठी लवकरच एक अद्ययावत सुविधा सुरू होणार आहे.

या सुट्टीच्या सीजन मध्ये मुंबई एअरपोर्टच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर्ससाठी दिलासा देणारी बातमी आहे. विमान तळावरच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारे 'सरफेस मूव्हमेंट रडार' सिस्टम लवकरच बसवण्यात येणार आहे. या सिस्टमच्या मदतीने विमानतळ्यावरचे अपघात टाळण्यात मदत होईल. शिवाय विमानतळावरील सुरक्षाही सक्षम होईल. या यंत्राचं सध्या तात्पुरत्या स्वरुपातील यंत्रणा बनवण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर अजून प्रश्नचिन्हच आहे.

गेल्या काही दिवसात मुंबई विमानतळावर अपघात होता-होता टळले. पण याचा परिणाम विमान उड्डाणावर होतो. यामुळे मुंबई विमानतळावर होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीवर उपाय म्हणून इथल्या विमानतळ व्यवस्थापनाने तिथल्या हेलिकॉप्टरची उड्डाणं जुहूच्या पवन हन्स विमानतळावर हलवले आहेत.

close