कोणत्याही चौकशीसाठी हजर राहायला तयार आहोत – पंतप्रधान

December 20, 2010 10:15 AM0 commentsViews: 3

20 डिसेंबर

काँग्रेसचे 83 वं महाअधिवेशन दिल्लीत सुरू आहे. आजच्या दुसर्‍या दिवशी विरोधकांवर हल्लाबोल करत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्यावरच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. आपल्याजवळ लपवण्यासारखं काहीच नाही आणि कोणत्याही चौकशीसाठी हजर राहायला तयार आहे असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या 83 व्या महाअधिवेशनाच्या आजच्या दुसर्‍या दिवशी ते बोलत होते. विरोधकांवर हल्लाबोल करत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्यावरच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. त्यांनी काँग्रेसचे ऐतिहासिक महत्व तर सांगितलंच. पण स्वत:च्या स्वच्छ चारित्र्याचा निर्वाळाही दिला. 2 जी प्रकरणी जेपीसीची मागणी म्हणजे केवळ राजकीय स्टंट असल्याचं मत त्यांनी मांडलं.2 जी आणि कॉमनवेल्थमधल्या दोषींना शिक्षा होणारच. कोणाचाही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आरोप करण्यापूर्वी विरोधकांनी स्वत:कडे पहावे असं ते म्हणाले. 2 जी बाबत चौकशीवर विश्वास ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं.जेपीसीच्या मागणीमागे या प्रकरणाला राजकीय वळण देणं हाच हेतू आहे, असं उत्तर त्यांनी विरोधकांच्या आरोपांना दिलं.

close