कांदा महागण्याची शक्यता

December 20, 2010 11:17 AM0 commentsViews: 4

20 डिसेंबर

राज्यात अवकाळी पावसाचा कहर ओसरला आणि कडाक्याच्या थंडीने जोरदार हजेरी लावली. आता या थंडीत कांद्याचा भाव ऐकून घाम आल्याशिवाय राहणार नाही.

नाशिकच्या घाऊक बाजारात विक्रमी दराने कांद्याची विक्री झाली आहे. मनमाड बाजार समितीत 5 हजार 600 रुपये क्विंटल, लासलगाव बाजार समितीत कमाल 6 हजार 500 रुपये क्विंटल, नांदगाव बाजारसमितीत 5 हजार रुपये क्विंटल या चढत्या दराने कांद्याची विक्री झाली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली. बाजारातल्या मागणीपेक्षा कांद्याची आवाक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात हा कांदा 70 रुपये किलोच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.

close